चेरी
चेरी : (इं. वाइल्ड चेरी, स्वीट चेरी, जीन; लॅ. प्रूनस अॅव्हियम; कुल-रोझेसी). हा पानझडी वृक्ष सु. ५ – २५ मी. उंच वाढतो. यूरोप, अमेरिका, ब्रिटन व वायव्य हिमालयात २,४४० मी. उंचीवर याचा प्रसार आहे; काश्मीर, कुलू व सिमला येथे हा लागवडीत आहे. याची साल लालसर तपकिरी असून आडव्या खवल्यांनी ती सुटून निघते.